आमच्या ओळखीत काही जणांनी स्वतः पिआर करुन कॅनडात येऊन जोब शोधले आहेत. त्यामुळे पिआर करणे आणि जॉब मिळणे ही अवघड गोष्ट नाही. पण ज्यांनी केले आहेत ते शक्यतो भारतातुन पिआर करुन इथे आले (मोस्ट्ली कुटुंबाला भारतातच ठेऊन). इथे येऊन जॉब शोधला आणि मग कुटुंबाला बोलावुन घेतले.
आमच्या केस मध्ये तुम्ही आधिच्या धाग्यात वाचल्या प्रमाणे नवर्याने आधी एक दोन वर्ष कॅनडातल्या ब्रांचमधल्या लोकांशी नेट्वर्किंग करणे सुरु केले होते. त्यामुळे त्याच्या प्रोफाईला साजेशी संधी येताच वेग वेगळ्या लोकांनी त्याला या रिकाम्या होणार्या जागेबद्दल आणि हायरिंग मॅनेजरला त्याच्या बद्दल सांगितले. हे सगळं पाल्हाळ सांगण्याचा उद्देश हा कि तुझ्या कंपनीची ब्रांच इथे असेल तर नेटवर्किंग चालु करायला हरकत नाही. अर्थात तुझ्या सध्याच्या साहेबाला चालणार असेल तर. त्याला कल्पना देउन त्याच्याकडुन किंवा अजुन कोणी सिनिअर मेंटॉर असेल तर त्याच्या कडुन काही होईल का याची चाचपणी करायला हरकत नाही. या गोष्टीसाठी वेळ लागेल पण हा एक हमखास नोकरी मिळण्याचा यशस्वी मार्ग आहे.
शिवाय, ज्या लोकांनी इथे येऊन नोकरी शोधली त्यांना त्यांच्या आधीच्या प्रोफाईल पेक्षा थोड्या खालच्या पातळीवर सुरुवात करावी लागली कारण जरी तुमची पात्रता असली तरी तुमच्या कामबद्दल हमी देणारी, तुमच्या बरोबर काम केलेली लोकं इथली नसतात. काही अपवाद असतील पण मी ज्यांचे अनुभव ऐकले त्यांनी तरी असे सांगितले.
शिवाय, ज्या लोकांनी इथे येऊन नोकरी शोधली त्यांना त्यांच्या आधीच्या प्रोफाईल पेक्षा थोड्या खालच्या पातळीवर सुरुवात करावी लागली कारण जरी तुमची पात्रता असली तरी तुमच्या कामबद्दल हमी देणारी, तुमच्या बरोबर काम केलेली लोकं इथली नसतात. काही अपवाद असतील पण मी ज्यांचे अनुभव ऐकले त्यांनी तरी असे सांगितले.
शिपिंग इंडस्ट्रीमधे माझ्या काही ओळखी नाहीत. नवर्याला विचारुन बघते. आमचे काही कस्ट्मर्स शिपिंग इन्डस्ट्री मधे आहेत आणि नवरा सेल्स मधे असल्यामुळे त्याचे काही काँटॅक्ट असतील तर विचारेन (आत्ता तो परगावी आहे).
सरकारकडुन एक्स्पेन्सेस मिळण्याबाबत मला काही कल्पना नाही आणि मिळत जरी असतील तरी ती अगदीच तुटपुंजी रक्कम असेल असे मला तरी वाटते. कॅनडा गवर्मेंट्च्या वेबसाईट्वर कदाचीत काही माहिती मिळेल.
as a bachelor आणि पुढे फॅमीली आल्यावर खर्चात किती तफावत येते? ऑन अॅन अॅवरेज हाउसींग, शाळा, भाजी-पाला वगैरे साठि साधारण किती खर्च येतो?
कॅनडामधे हाऊसिंग महाग आहे, विशेषतः व्हॅंकुवर आणि टोरांटोमधे, पण एकटे रहाणार असाल आणि शेअर्ड अकोमोडेशनला हरकत नसेल तर ५००CAD/महिना किंवा कमी मधे सुद्धा राहायची सोय होऊ शकेल. ग्रोसरी महिन्याला २००CAD (तु स्वतः करुनच खाणार असं ग्रुहित धरलंय ;)), युटिलिटीज कॉमन असतील तर साधारण १५०CAD (इलेक्ट्रीसिटि+ इंटरनेट), फोन ४५-५० CAD आणि कम्युट १५०- २०० CAD, जर नोकरी नसेल तर बाकी खर्च करण्यावर थोडे नियंत्रण असेल म्हणुन हा हिशोब केला आहे. तर साधारण १००० CAD/ महिना असा खर्च धरायला हरकत नाही. कोणीही जर पेनी पिंचर असेल तर बर्यापैकी कमी पैशात काम भागायला हरकत नाही.
पुढे जर कुटुंबाला आणायचे असेल तर २ बेडरुम अपार्ट्मेंटला आमच्या एरीयामध्ये साधारण १५००- १७०० भाडं आहे. नुकताच काही टेनंट प्रोटेक्षन लॉ पास झाला आहे त्यामुळे लाँग्टर्म लीज करणेसुद्धा सहज शक्य होईल असे वाटते. टाऊन्हाऊस भाड्याने घ्यायचे झाल्यास साधारण १८००- २००० पर्यंत मिळेल. सध्या हाऊसिंग मार्केट खूप हाय आहे . सिन्गल फॅमिली होम (३/४ बेडरुम्स) विकत घ्यायचे असल्यास साधारण ८००,००० ते १,०००,००० पर्यंत किमती आहेत आणि तेही जुन्या घरांच्या. असो तो नंतरचा प्रश्न आहे पण एक कल्पना असावी म्हणुन सांगितले. आणि मग बाकी खर्च तुमच्या कुटुंबाच्या आकाराच्या आणि कोणत्या गोष्टिसाठी खर्च करण्याला प्राधान्य आहे त्याप्रमाणे वाढेल. (छोटं घर, पब्लिक ट्रांस्पोर्ट, युस्ज्ड कार Vs नविन कार, अॅक्टीविटीज इ. इ.). मु़ख्य म्हणजे वर्क व्हिजा/पिआर असल्यावर हेल्थ केअर कार्ड मिळते. त्यामुळे किरकोळ आजारासाठी वॉक-इन डॉक्टरकडे गेल्यास एक पै खर्चावी लागत नाही. प्रिस्क्रिप्शन वर कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समुळे काही डिस्काऊंट मिळतो. (कुवेतचं मला माहित नाही पण आम्ही ६ वर्ष युएस मधे रहिल्यामुळे तिथल्या हेल्थकेअर पेक्षा ही सिस्टीम आम्हाला फारच छान वाटली)
सरकारी शाळांमध्ये एजुकेशन फ्री आहे (थोडीफार अॅक्टीविटी फी वगैरे असेल पण अगदीच नगण्य). आपल्या कॅचमेंट मधल्या शाळेत प्रवेश सहज मिळतो. शिवाय अर्ली /लेट फ्रेंच इमर्शन असे पर्याय सरकारी शाळेतही उपलब्ध आहेत. शाळांचा दर्जा युएसच्या शाळांच्या तुलनेत चांगला आहे असं ऐकलं वाचलं आहे. मुलांना डे केअर मधे वगैरे पाठवायचा साधारण खर्च ८००- १००० CAD/ child upto 5yrs. ज्या वर्षात मुल पाच वर्षाचे होते त्या वर्षात सप्टेंबरमधे केजी मध्ये घालु शकता. बिफोर आणि आफ्टर स्कुल केअर सेंटर शाळेत किंवा शाळेच्या जवळपास मिळुन जाते.
शिवाय कम्युनिटी मधल्या सोयी चांगल्या आहेत. पब्लिक पार्क्स, रिक्रिएशन सेंटर्स चांगली आहेत. पब्लिक ट्रांस्पोर्ट चांगले आहे. मल्टी एथनीक कम्युनिटि आहे. व्हॅंकुवरमधे हिवाळ्यात तापमान शुन्याच्या (c) खाली फार कमी वेळा जाते, सिटित स्नो पडला तर अगदी अर्धा दिवस वगैरे रहातो. आजुबाजुच्या डोंगरांवर बघायला मिळतो. गावातच २-३ स्कि रिसॉर्ट्स पण आहेत.
No comments:
Post a Comment