कॅम्पिंग हा प्रकार वेगळ्या नावाने आपण भारतात करतच असतो. ते ट्रेक्स जेव्हा आपण दिवसभर वणवण करून कोण्या एका गडावर जातो ,तिथल्या मंदिरात किंवा गुहेत पथारी पसरतो. भोवतालचे तीन दगड एकत्र करून सोबत नेलेल्या सामानातून काही बाही शिजवून खातो आणि सोबत आणलेल्या पांघरुणात मस्त ताणून देतो. थोड्याफार फरकाने या अश्याच प्रकाराला बाहेरच्या देशांमधे हायकिंगआणि कॅम्पिंग म्हणतात. पुण्यात राहत असताना सह्याद्रीमध्ये एकदिवसीय नाईट ट्रेक भरपूर केले. तेंव्हा हायकिंगआणि कॅम्पिंगसाठी कश्याप्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतात ह्याची फारच जुजबी माहिती होती. आत्ता माझ्याकडे जे काही हायकिंगआणि कॅम्पिंग साहित्य आहे ते जर माझ्याकडे भारतात असताना देखील असले असते तर त्या ट्रेक्सना अजून रंगत आली असती.
आम्ही (मी आणि नवऱ्याने ) भारतातही बरंच ट्रेकींग केल्यामुळे अमेरिकेत आल्यावर सुद्धा इथे आपल्याला कुठे कुठे जाता येईल याचा अंदाज घ्यायला सुरुवात झाली आणि इथेही ट्रेकींग आणि त्याच्या जोडीने कॅम्पिंग सुरु झालं . हळुहळु करत जे गरजेचं आहे ते कॅम्पिंगच सामान आमच्याकडे जमा होत गेलं. त्याचीच माहिती या लेखात द्यायचा प्रयत्न आहे.सुरुवातीला टेंट बद्दल बघू, कुठेही (भौगोलीक दृष्ट्या) आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानात वापरण्यायोग्य टेंट हवा असेल तर डबल वौल्ड , थ्री सीजन , वेस्टिब्युल असलेला टेंट घेतलेला चांगला. वेस्टिब्युल म्हणजे टेंटच्या दारासमोर थोडा आडोसा असलेला भाग , याचा उपयोग पावसात स्टोव्ह पेटवून खाणे तयार करण्यासाठी किंवा जास्तीचे सामान ठेवण्यासाठी होतो. जर मुख्यत्वे backpacking प्रकारचे कॅम्पिंग करायचे असल्यास हलका साधारण दोन किलोच्या आसपास (पाच पौंड पेक्षा कमी )वजन असलेला टेंट घेतलेला बरा.
खालच्या फोटोमध्ये टेंटच्या समोरच्या भागात जो ताणून पुढे आलेला भाग आहे तोच वेस्टिब्युल एरिया
अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे backpack किंवा rucksack - ऑस्प्रे कंपनी अप्रतीम backpack बनवण्यात अग्रेसर आहे. डोयटर (Deuter) कंपनीसुद्धा चांगल्या प्रकारच्या backpack बनवते. भारतात आड्वेंचर वल्ड या कंपनीच्याही backpack मिळतात . जर उद्देश नुसते एक दिवसाचेच ट्रेक्स करायचा असेल तर साधारण २० ते ३० लि. ची backpack पुरेशी असते पण २ -३ दिवसांच्या ट्रेकसाठी ५०लि आणि ५ पेक्षा अधिक दिवसांच्या ट्रेकसाठी ७० लि. ची backpack असेल तर सगळे सामान त्यात व्यवस्थित बसते.
माझ्याकडे ४० लि. ची आड्वेंचर वल्डची backpack आहे तर नवऱ्याकडे ऑस्प्रेची ६०लि. ची. माझ्या bag ला खांद्यावर येणाऱ्या पट्यांना चांगले कुशनिंग आहे तसेच bag हेलकावे न खाता पाठीवर व्यवस्थित बसण्यासाठी कमरेला बांधायला सुद्धा एक पट्टा आहे. पाठीला आधारासाठी bag च्या आतल्या बाजुला दोन अल्युमिनीयमच्या पट्ट्या आहेत. ऑस्प्रे bag ला असेच खांद्याचे आणि कमरेचे पट्टे आहेत पण पाठीला वरपासुन खाली पर्यंत आधार देणारे जास्त चांगले पॅडिंग आहे.
फोटो आड्वेंचर वल्डची backpack - फोटो ऑस्प्रेची backpack
आता स्लीपिंग bag आणि स्लीपिंग पॅड/mat निवडीबद्दल थोडी माहिती घेऊया .
साधारणत: स्प्रिंग, समर ,फॉल (वसंत ऋतु , उन्हाळा आणि शरद ऋतु / पानगळ) या दरम्यान कॅम्पिंग करायचे असल्यास २० ते ३० डिग्री फ़ेरनाईट (- ६ ते -१ डिग्री सेल्सिअस ) साठी तयार केलेली स्लीपिंग bag पुरेशी होईल तर low altitude विंटर कॅम्पिंगसाठी ० ते १५ फ़ेरनाईट(- १८ ते -९ डिग्री सेल्सिअस) साठी तयार केलेली स्लीपिंग bag घ्यावी. डाऊन आणि सिंथेटीक अश्या दोन प्रकारच्या स्लीपिंग bag असतात. सिंथेटीक प्रकारची स्लीपिंग bag ही डाऊनच्या तुलनेत थोडी जड असते पण ओली झाल्यास लवकर वाळते.
डाऊन (नारंगी)आणि सिंथेटीक (निळी) स्लीपिंग bag.
डाऊन (नारंगी)आणि सिंथेटीक (निळी) स्लीपिंग bag.
स्लीपिंग पॅड निवडताना त्याचे R रेटिंग महत्वाचे असते. जेवढे जास्त R रेटिंग तेवढे चांगले इन्सुलेशन पण तेवढेच जास्त वजनही वाढते मग या स्लीपिंग पॅडचे. ३ R रेटिंग असलेले स्लीपिंग पॅड वेगवेगळ्या वातावरणातल्या कॅम्पिंगसाठी पुरेसे होऊ शकते आणि त्यामानाने वजनाने देखील हलके असते. काही फुगवून वापरायची स्लीपिंग पॅडस कमी जागा व्यापणारी आणि वजनाने हलकी अशी असतात . Therm-a-rest, Exped, Big Agnes यांची स्लीपिंग पॅड चांगली आहेत. अगदीच हलके काही हवे असेल तर फोमचे स्लीपिंग mat ही मिळतात पण यात इन्सुलेशन फारच कमी असते.
Exped
आता कॅम्पसाइटवर खाणे तयार करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्वयंपाकाचा स्टोव्ह आणि भांडी
MSR या कंपनीचे Whisperlite / Dragonfly हे दोन स्टोव्ह वेगवेगळ्या इंधनावर (multiple fuel) वापरता येतात. त्यामुळे ते भारताबाहेर आणि भारतातही तेवढ्याच सहजतेने वापरता येऊ शकतात, शिवाय high altitude आणि थंड विरळ हवेत सुद्धा हे स्टोव्ह चांगले चालतात. GSI आणि snow peak ह्यांची भांडी चांगल्या दर्जाची वजनाला हलकी आणि कमी जागेत मावणारी आहेत.इथे शक्यतो सगळ्या स्पोर्टींग गुडसच्या दुकानात fuel canister मिळतो. मोठ्या सुपरमार्केट मध्ये कोलमन चे मोठे स्टोव्ह आणि fuel canister मिळतात ते backpacking पेक्षा कार कॅम्पिंगसाठी जास्त सोयीस्कर असतात.
high altitude मध्ये पाणी गरम करण्यासाठी उपयुक्त असे jetboil भांडे . पाणी गरम झाले कि यावरचा इंडिकेटर नारंगी रंगाचा होतो.
high altitude मध्ये पाणी गरम करण्यासाठी उपयुक्त असे jetboil भांडे . पाणी गरम झाले कि यावरचा इंडिकेटर नारंगी रंगाचा होतो.
जेट बॉईल
केनिस्टर सह कुकिंग स्टव्ह
कुकिंग किट
या व्यतिरिक्त कॅम्पिंग आणि हायकिंगला पूरक अश्या गोष्टी म्हणजे चांगले सोल असलेले हायकिंग ( हे मोठ्या हाईकच्या आधी घेऊन वापरायची सवय करावी). हायकिंग पोल, Swiss knife, Nalgene बॉटल , dry compressions sacks , हेड lamp, कॅम्पसाइट lamp , हमक अश्या गोष्टी सुद्धा उपलब्ध आहेत.
Nalgene बॉटल आणि हमक पॅक
कॅम्पिंग आणि हायकिंग साहित्य घेण्यासाठी अजून जास्त महिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



No comments:
Post a Comment